तो रात्रंदिवस पाळत ठेवायचा, खासगी माहिती सोशल मीडियावर टाकायचा; मोठ्या अभिनेत्रीने सांगितला 'तो' घृणास्पद प्रसंग!
Sahiba Bali On Stalker: बॉलिवूड हे असे क्षेत्र आहे, ज्यात तुम्हाला नाव, पैसे असं सर्वकाही मिळतं. मात्र याच क्षेत्राची एक एक बाजू अशीही आहे, जिथे दगाबाजी, शोषण असे प्रकारही घडतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआतापर्यंत अनेक अभिनेत्र्या कास्टिंग काऊच्या शिकार झालेल्या आहेत. अशा अभिनेत्र्यांची अनेक उदाहरणं देता येतील. बॉलिवूडमध्ये काही जणांना यश न आल्याने जीवन संपल्याच्याही अनेक घटना आहे.
काही-काही अभिनेत्र्यांना तर विचित्र प्रकारांना सामोरे जावे लागते. दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या चमकीला या चित्रपटात अभिनेता दिलजीत दोसांझ याच्यासोबत लीड महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री साहिबा बाली हिनेदेखील तिच्यासोबत घडलेला असाच एक प्रसंग सांगितला आहे.
बाली हिने हीने नुकतेच हॉटरफ्लाय या मनोरंजनविषयक संकेतस्थळाला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्यावर पाळत ठेवत असलेल्या एका माणसाबद्दल सांगितलं आहे. तिने सांगितल्यानुसार ही व्यक्ती बालीच्या आयुष्यातील खासगी प्रसंगांचा वापर करून सोशल मीडियावर खोट्या गोष्टी पसरवायची. त्यानंतर बालीने या व्यक्तीविरोधात एक तक्रार दाखल केली होती.
बालीने सांगितलं की संबंधित व्यक्ती माझ्याशी निगडित होती. मी त्या व्यक्तीला ओळखत होते. ती व्यक्ती माझ्या आयुष्यात घडलेल्या घडामोडींबाबत रेडिट, इन्स्टाग्राम तसे इतर साईट्सवर खोट्या स्टोरीज सांगायची.
दरम्यान, बालीने या व्यक्तीविरोधात थेट पोलिसांत तक्रार केली होती.
साहिबा बाली