Vastu Tips : स्वयंपाकघरातील 'या' वस्तू कधीच कमी होऊ देऊ नका, अन्यथा... वास्तूशास्त्रात नेमकं काय म्हटलंय?

Vastu Tips : जर तुमच्या घरात सुख-समृद्धी असेल तर ते घर स्वर्गासमान असतं. कारण, आपल्या घरातील स्वयंपाकघरातच देवी अन्नपूर्णाचा वास असतो.

Vastu Tips

1/8
आपल्या घरात धन-धान्याची बरकत व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण, नकळतपणे आपल्याकडून अशा काही चुका होतात ज्यामुळे घरात दारिद्र्य येते. ज्योतिष शास्त्रानुसार, या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.
2/8
हिंदू धर्मात घर एक मंदिर आहे. जर तुमच्या घरात सुख-समृद्धी असेल तर ते घर स्वर्गासमान असतं. कारण, आपल्या घरातील स्वयंपाकघरातच देवी अन्नपूर्णाचा वास असतो.
3/8
आपल्या किचनमध्ये अनेक प्रकारच्या वस्तू आपण ठेवतो. याचा वापर दैनिक जीवनात जेवण बनवताना केला जातो. पण, वास्तूशास्त्रात अशा काही वस्तूंबद्दल सांगितलं आहे जे कधीच संपू नयेत. या वस्तू कोणत्या ते जाणून घेऊयात.
4/8
पीठ - पीठ मळताना पीठ मळण्याचं पात्र कधीच रिकामं ठेवू नका. वास्तूशास्त्रानुसार, हे दारिद्र्याचं देखील लक्षण आहे.
5/8
तांदूळ - आपल्या आहारात तांदळाचा वापर रोजच केला जातो. त्याचबरोबर धार्मिक कार्यात देखील तांदळाचा वापर करतात. त्यामुळे कधीच तुमच्या स्वयंपाकघरातील तांदू ळ कमी होऊ देऊ नका. यामुळे शुक्र ग्रह कमजोर होतात.
6/8
हळद - हळदीचा वापर जेवण बनवण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर धार्मिक आणि शुभ कार्यात हळदीला शुभ मानण्यात आलं आहे. हळदीत भरपूर औषधी गुणधर्म असतात. वास्तूशास्त्रानुसार, स्वयंपाकघरातील हळद संपणं म्हणजे घरात सुख-सौभाग्य कमी होण्याचं कारण आहे.
7/8
मीठ - मिठाशिवाय जेवणाला चव येत नाही. पण जर घरातील मीठ संपलं तर घरातसुद्धा वातावरण बिघडू शकतं. वास्तूशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, मिठाच्या संपण्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो.
8/8
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola