Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचं कॅप्टन कुणी व्हावं? टीम इंडियाच्या खेळाडूला प्रश्न, रोहित अन् हार्दिक सोडून तिसरं नाव सांगितलं

टीम इंडियाचा आणि लखनौ सुपर जाएंटसचा खेळाडू अमित मिश्रानं एका पॉडकास्टमध्ये विविध विषयांवर भाष्य केलं. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन कोण व्हावं, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शुभंकर मिश्रा याच्या पॉडकास्टमध्ये अमित मिश्रानं महेंद्रसिंग धोनी, लखनौचा कॅप्टन केएल राहुल यांच्याविषयी भाष्य केलं. महेंद्रसिंह धोनी पुढच्या आयपीएलमध्ये काही सामने खेळेल, असंही त्यानं म्हटलं.

मुंबई इंडियन्सचं कॅप्टनपद हार्दिक पांड्याकडे देण्यात आलेलं आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्स दमदार कामगिरी करु शकलेली नाही.
मुंबई इंडियन्सबाबत प्रश्न विचारला असता अमित मिश्रानं रोहित शर्मानं त्याला पुन्हा कॅप्टनपद मिळाल्यास मुंबईसोबत थांबावं असं म्हटलं. कारण रोहित शर्माचं त्या टीम सोबत भावनिक नातं आहे, असं अमित मिश्रा म्हणाला.
अमित मिश्राला ज्यावेळी मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा किंवा हार्दिक पांड्या या पैकी कुणी व्हावं, असं विचारलं असता त्यानं सूर्यकुमार यादवचं नाव सांगितलं.