Ashadi Ekadashi Pandharpur Wari : वारकऱ्यांनी स्वतःच्या हातांनी बनवली माऊलींची सुंदर वस्त्रे! आषाढी वारीत 'झी टॉकीज'चा खास उपक्रम
पंढरपूरची वारी म्हणजे संतांचा उत्सव समजला जातो. यंदा झी टॉकीजने वारीचे विशेष आयोजन केले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appझी टॉकीजने दोन भव्य कॅन्टर ट्रकची उभारणी केली असून, त्याठिकाणी 12 फूट उंचीच्या विठोबा आणि रुक्मिणीच्या मूर्तींची स्थापना केली होती. ज्यामुळे वारीत एक विशेष आकर्षण निर्माण झाले.
वारीच्या 21 दिवसांच्या प्रवासात झी टॉकीजची टीम 300 दिंड्यांसह सहभागी झाली होती. पण झी टॉकीजने यंदा वारीत आणखी एक अनोखी कल्पना आणली.
प्रत्येक वारकऱ्याच्या मदतीने कॅन्टर ट्रकवर माऊलींची वस्त्रे आणि रुक्मिणीची साडी बनवण्याचे नियोजन केले.
सर्व वारकऱ्यांनी केलेल्या श्रमदानामुळे माऊलींची अतिशय सुंदर अशी वस्त्रे तयार झाली आहेत . ही वस्त्रे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीला अर्पण करण्यात येणार आहेत.
गेल्या वर्षी झी टॉकीजने तुकाराम महाराजांच्या मार्गाचा अवलंब केला होता. तर यंदा ज्ञानेश्वर महाराजांच्या मार्गाने प्रवास सुरू आहे. या वर्षीची वारी 29 जून ते 17 जुलै दरम्यान सुरू आहे.
या ट्रकवर अनेक सेलिब्रिटींनी देखील माऊलींचे दर्शन घेतले. अभिनेता-अँकर अमित रेकीने तिथे उपस्थित राहून सेलिब्रिटींसोबत संवाद साधला आणि वारकऱ्यांशी त्यांच्या प्रवासाबद्दल चर्चा केली.
झी टॉकीजच्या या नवकल्पनाशील उपक्रमामुळे वारीची धमाल आणखी वाढली आहे. त्यामुळे यंदाची वारी अधिक उत्साहपूर्ण, रंगतदार आणि विशेष ठरली आहे.