फॉर्म-16 ते टीडीएस, आयटीआर भरण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची गरज? जाणून घ्या सविस्तर....
आयटीआर फाईल करण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै आहे. 31 जुलैनंतर आयटीआर भरायचा असेल तर तुम्हाला दंड भरावा लागेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, आयटीआर भरताना वेगेवगळी कागदत्रे लागतात. ही कागदपत्रे कोणती आहेत, हे समजून घेणे गरजेचे आहे. अन्यथा ऐन वेळी तुमची अडचण होऊ शकते.
आयटीआर भरण्यासाठी तुमच्याकडे फॉर्म-16 असणे गरजेचे आहे. हा फॉर्म तुम्ही काम करत असलेल्या कंपनीकडून दिला जातो. फॉर्म-16 वर तुमचे वेतन, तुमचा कापलेला कर आदीविषयी सविस्तर माहितीअसते.
आयटीआर भरताना तुमच्याकडे पॅन कार्ड असणेदेखील गरजेचे आहे. पॅन कार्डशिवाय तुम्ही आयटीआर फाईल करू शकत नाही.
व्याजाच्या रुपात मिळणारे पैसे तसेच अन्य आर्थिक व्यवहाराच्या माहितीसाठी तुमच्याकडे बँकचे स्टेटमेंट असणेही गरजेचे आहे.
कर वाचवण्यासाठी आवश्यक असणारी पीपीएफ, एनएससी, ईएलएसएस आदी कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे टीडीएस प्रमाणपत्र असणेही गरजेचे आहे.
आयटीआर भरण्यासाठी तुमच्याकडे फॉर्म 26एएस हे कागदपत्रही गरजेचे आहे. या फॉर्मला तुम्ही प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टवरून डाऊनलोड करू शकता.
सांकेतिक फोटो