मोहम्मद शमीचा नवा लूक; अचानक केस वाढली तरी कशी?, चाहत्यांचा प्रश्न, जाणून घ्या रहस्य!
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. (Photo Credit-Mohmmad Shami)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोहम्मद शमीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो नवीन लूकमध्ये दिसत आहे. पण चाहत्यांकडून सोशल मीडियावर काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.(Photo Credit-Mohmmad Shami)
एका वर्षापूर्वी मोहम्मद शमीच्या डोक्यावरील केस खूप कमी होते.(Photo Credit-Mohmmad Shami)
2023 च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यानही शमीच्या डोक्यावर खूपच कमी केस दिसत होते. मग अचानक शमीचे केस इतक्या मोठ्या प्रमाणात कसे वाढले?, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. (Photo Credit-Mohmmad Shami)
गेल्या अनेक महिन्यांपासून दुखापतीमुळे टीम इंडियाबाहेर असलेला मोहम्मद शमी पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र याआधी शमीने हेअर ट्रान्सप्लांट केले. (Photo Credit-Mohmmad Shami)
दुखापतीमुळे शमी बराच काळ टीम इंडियातून बाहेर आहे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये शमीने भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता.(Photo Credit-Mohmmad Shami)
फेब्रुवारी 2024 मध्ये मोहम्मद शमीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. (Photo Credit-Mohmmad Shami)