Nikki Tamboli birthday celebration: बिग बॉसच्या घरात निक्कूताईंचा बड्डे दणक्यात साजरा!
बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्या आठवड्यापासून चर्चेत असलेल्या निक्की तांबोळीचा वाढदिवस साजरा करण्यात आल्याचं दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिक्की तांबोळी तिचा २८वा वाढदिवस यंदा बिग बॉस मराठीच्या घरात साजरा करत आहे. घरातील सर्व सदस्यांनी तिचा वाढदिवस साजरा केल्याचं पाहायला मिळालं!
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनचा पहिला आठवडा हा भांडणाने चांगलाच गाजला.
निक्कीने घरातल्या प्रत्येकासोबत घातलेल्या राड्याची बरीच चर्चा झाली आणि भाऊच्या धक्क्यावर त्याचा योग्य निकालही लागला. त्यातच निक्कीने वर्षा उसगांवकर यांच्यासोबत केलेल्या वागणुकीवर मात्र महाराष्ट्रातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
निक्की तांबोळी अनेक सेलिब्रेटींच्या म्युझिक अल्बममध्येही झळकली होती. तसेच तिचा कंचना-3 हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.
आता निक्की ही बिग बॉसच्या घरातही चर्चेत असलेली पाहायला मिळते!