bigg boss marathi 5 contestant : बिगबॉस गाजवणाऱ्या सूरज चव्हाणचा गुलिगत जलवा, लवकरच मोठ्या चित्रपटात झळकणार!

bigg boss marathi 5 contestant : गुलिगत धोका म्हणत सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा तसेच बिग बॉस मराठीचा सीझन गाजवत असलेला रील स्टार सूरज चव्हाण लवकरचं रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

'झापूक झुपूक बुक्कीत टेंगूळ' बोलत बिग बॉस मराठीचा सीझन गाजवत असलेला रील स्टार सूरज चव्हाण रुपेरी पडद्यावरुन चाहत्यांना भेटणार आहे. तमाम महाराष्ट्राचं प्रेम मिळवणाऱ्या सूरजच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

1/6
सोशल मीडिया ते 'बिग बॉस मराठी' असा प्रवास करणारा सूरज आता लवकरच रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
2/6
'राजाराणी' या चित्रपटात सूरज चव्हाण याने मुख्य नायकाच्या मित्राची भूमिका साकारली आहे.
3/6
ग्रामीण भागातील थरारक प्रेमकहाणी असलेला 'राजाराणी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे.
4/6
सूरजची भूमिका असलेला राजाराणी हा चित्रपट 18 ऑक्टोबर 2024 पासून सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
5/6
सूरज झळकणार असलेल्या राजाराणी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत रोहन पाटील आणि वैष्णवी शिंदे हे कलाकार दिसणार आहेत.
6/6
राजाराणी या चित्रपटाचे पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या पोस्टरमध्ये सूरजचा हटके अंदाज आणि लूक बघायला मिळत आहे.
Sponsored Links by Taboola