Mithali Raj : 23 वर्षांच्या तुफान कारकिर्दीनंतर मितालीची क्रिकेटमधून निवृत्ती; दमदार रेकॉर्ड्स आजही नावावर

भारताची अव्वल दर्जाची महिला क्रिकेटपटू मिताली राजने 23 वर्षे क्रिकेट खेळल्यानंतर मितालीने बुधवारी दुपारी सोशल मीडियाद्वारे निवृत्तीची घोषणा केली. दरम्यान, 39 वर्षीय मितालीने आजवर क्रिकेटच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करताना अनेक रेकॉर्ड्स नावे केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तिचे काही रेकॉर्ड आजवर कोणी तोडू शकलेलं नाही, तसंच तोडणंही अशक्य असल्याचं म्हटलं जातं.

मितालीला लेडी तेंडुलकर म्हटलं जातं, कारण भारतासाठी वनडे आणि टी20 क्रिकेट प्रकारात सर्वाधिक धावा तिनेच केल्या आहेत.
2017 महिला क्रिकेट विश्व चषकादर्मयान मितालीने सलग सात अर्धशतक लगावली असून अशी कामगिरी करणारी ती पहिलीच महिला क्रिकेटर आहे.
मिताली विश्वचषक स्पर्धेत 1,000 हून अधिक धावा करणारी पहिली भारतीय आणि पाचवी महिला क्रिकेटर आहे.
मितालीने वनडे सामन्यात सर्वाधिक रन केले असून 232 सामन्यात तिने 7 हजार 805 रन केले आहेत.
मिताली आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात दोन हजार धावा करणारी पहिली महिला भारतीय क्रिकेटर आहे.
मिताली 20 वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिली महिला क्रिकेटर आहे. 200 वनडे सामने खेळणारी एकमेव महिला क्रिकेट मितालीच आहे.
सहा एकदिवसीय वर्ल्ड कप खेळणारी मिताली एकमेव महिला क्रिकेटर आहे. टेस्ट सामन्यात दुहेरी शतक ठोकणारी मिताली एकमेव भारतीय महिला क्रिकेटर असून 2002 साली तिने इंग्लंड विरुद्ध 214 धावांची खेळी केली होती.
मितालीच्या जीवनावर लवकरच चित्रपट येणार असून तापसी पनू तिची भूमिका साकारणार आहे.