PHOTO: 'फ्राईडे नाइट प्लॅन' या वेब सीरिजमध्ये जुही साकारणार महत्त्वाची भूमिका!
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावलाचा (Juhi Chawla) चाहता वर्ग मोठा आहे. जुहीच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. काही दिवसांपूर्वी तिचा शर्माजी नमकीन हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. (photo:iamjuhichawla/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता ती एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जुही 'फ्राईडे नाइट प्लॅन' या वेब सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. याबाबत जुहीनं ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. (photo:iamjuhichawla/ig)
निर्मात्यांनी जुहीला दिलेल्या वेलकम नोटमध्ये लिहिलं, 'जुही आम्ही तुम्हाला फ्राईडे नाइट प्लॅनच्या टीममध्ये सामील करुन घेण्यासाठी उत्सुक आहोत. तुमच्यासोबत लवकरच शूटिंग सुरु करण्यासाठी देखील उत्सुक आहोत. '
सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन जुहीनं फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांचे आभार मानले. तिनं पोस्टमध्ये लिहिलं, 'या खास पद्धतीनं केलेल्या स्वागताबद्दल मी तुमचे आभार मानते. रितेश आणि फरहान धन्यनवाद. लवकरच भेटूयात एक्सेल मूव्हिजमध्ये '(photo:iamjuhichawla/ig)

शर्माजी नमकीन या चित्रपटामध्ये जुहीसोबतच परेश रावल, सोहेल नैय्यर, तारुक रैना, सतीश कौशिक, शीबा चड्ढा आणि ईशा तलवार या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफोर्मवर 31 मार्च रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता. स्वर्ग, प्रतिबंध, बोल राधा बोल, राजू बन गया जेंटलमॅन, लुटेरे, हम है राही प्यार के या जुहीच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. (photo:iamjuhichawla/ig)