IND vs BAN : भारत-बांगलादेश T20I मालिकेदरम्यान स्टार खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती
भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ग्वाल्हेरमध्ये बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. या मालिकेतील दुसरा सामना आता ९ ऑक्टोबरला दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सामन्यापूर्वी बांगलादेश संघाच्या एका अनुभवी खेळाडूने निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. 38 वर्षीय महमुदुल्लाह ज्याने T20I क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
शकीब अल हसनच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर अवघ्या काही दिवसांनी महमुदुल्लाहने निवृत्ती जाहीर केल्याने बांगलादेश क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. आणि दोन दिग्गजांनी निवृत्ती घेतल्याने बांगलादेश संघाला मोठा धक्का बसला आहे. आता या खेळाडूंची जागा कोण भरणार हे पाहायचे आहे.
गेल्या महिन्यात शकीब अल हसनने अचानक टी-20I आणि कसोटीतून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. तो म्हणाला होता की, मी शेवटचा टी-20I सामना खेळला आहे आणि आता त्याला आपल्या देशात शेवटची कसोटी मालिका खेळायची आहे.
38 वर्षीय महमुदुल्लाहने 2007 मध्ये केनियाविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो गेल्या 17 वर्षांपासून बांगलादेशकडून क्रिकेट खेळत होतो. शकीब अल हसन आणि झिम्बाब्वेच्या शॉन विल्यम्सनंतर तिसरा सर्वात मोठा टी-20 करिअर करण्याचा विक्रम महमुदुल्लाच्या नावावर आहे.
महमुदुल्लाहने याआधी 2021 मध्ये कसोटीतून निवृत्ती घेतली होती, पण तो वनडे खेळत राहिला. महमुदुल्लाहने 139 टी-20 सामन्यांमध्ये 117.74 च्या स्ट्राइक रेटने 2395 धावा केल्या आहेत. याशिवाय या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 40 विकेट्स आहेत.