ह्युंदाई ते स्विगी, चार मोठे आयपीओ येणार, पैसे कमवण्याची ही संधी अजिबात सोडू नका!
मुंबई : गेल्या काही दिवसांत अनेक बड्या कंपन्यांचे आयपीओ आले आहेत. यातील बहुतांश आयपीओंनी आपल्या गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स दिले आहेत. आगामी काळाच चार मोठे आणि महत्त्वाचे आयपीओ येणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appह्युंदाई, स्विगी, एनटीपीसी ग्रीन एनर्जी, एथर एनर्जी अशी या चार आयपीओंची नावे आहेत. या चारही कंपन्या लवकरात लवकर आपले आयपीओ घेऊन येणार आहेत.
यातील ह्युंदाई आयपीओ देशातील सर्वांत मोठा आयपीओ असणार आहे. हा आयपीओ 25 हजार कोटी रुपयांचा असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या आयपीओला सेबीकडून अप्रुव्हलदेखील मिळालं आहे.
देश हरित उर्जेच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. असे असताना या क्षेत्रात काम करणाऱ्या एनटीपीसी या कंपनीचा आयपीओ येणार आहे. हा आयपीओ 10 हजार कोटी रुपयांचा असणार आहे.
ऑनलाईन फुड डिलिव्हरी क्षेत्रात काम करणाऱ्या स्विगी या कंपनीचाही आयपीओ येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा आयपीओ 5 हजार कोटी रुपयांचा असणार आहे.
इलेक्ट्रिक स्कुटर तयार करणारी एथर ही कंपनी आपला आयपीओ घेऊन येणार आहे. हा आयपीओ एकूण 3100 कोटी रुपयांचा अेल. फ्रेश शेअर आणि ऑफर फॉर सेलच्या माध्यातून ही कंपनी आपले शेअर्स विकणार आहे. दरम्यान, हे चारही आयपीओ नेमके कधी येणार हे स्पष्ट झालेले नाही. लवकरच या आयपीओंच्या तारखा स्पष्ट होणार आहेत.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
सांकेतिक फोटो