महिलांना आनंदी आनंद; सिंधुदुर्गात लाडक्या बहिणींनी दाखवले मेसेज, जालन्यात थेट माजी मंत्र्यांना फोन
राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या आणि सर्वात लोकप्रिय योजना ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता 3000 रुपये आजपासूनच जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच महिलांच्या खात्यात राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा झाल्याचे स्क्रीनशॉट समोर आले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा झाले असून त्यांनी आपले स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. तसेच, मोबाईल हाती धरुन हे मेसेज दाखवत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत
राज्य सरकारने रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे 3000 रुपये एकाच दिवशी जमा केले आहेत. महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याचे स्क्रीनशॉटही सध्या सिंधुदुर्गात व्हायरल होत आहेत
सिंधुदुर्गासह जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील महिला भगिनींना देखील पैसे मिळाले असून त्यांच्या बँक खात्याचे स्कीनशॉट समोर आले आहेत.
जालना येथील काही महिला बांधवांनी माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटातील नेते अर्जुन खोतकर यांना फोन करुन याबाबत माहिती दिली. तसेच, राज्य सरकारचे आभारही मानले आहेत.
राज्य सरकारने 17 ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यात 3 हजार रुपये जमा होणार असल्याचे म्हटले होते. मात्र, रक्षाबंधनाची ही ओवाळणी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येलाच जमा झाली आहे.