Rohit Sharma : श्रीलंकेविरुद्ध धमाकेदार फलंदाजी,हिटमॅनचा जलवा कायम,वनडे रँकिंगमध्ये रोहित शर्माला मानाचं स्थान
भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन रोहित शर्मा यानं युवा खेळाडू शुभमन गिलला मागं टाकत आयसीसी वनडे रँकिंगमध्ये दुसरं स्थान पटकावलं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत केलेल्या कामगिरीचा त्याला फायदा झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयसीसी वनडे फलंदाजांच्या रँकिंगमध्ये बाबर आझम पहिल्या स्थानावर असून रोहित शर्मा दुसऱ्या तर शुभमन गिल तिसऱ्या स्थानावर आहे.
रोहित शर्माचे आयसीसी रँकिंगमध्ये 765 पॉइंट आहेत. तर, बाबर आझमकडे 824 पॉइंट आहेत. शुभमन गिलच्या नावावर 763 पॉइंट आहेत. यापूर्वी विराट कोहली 909 गुण मिळवत बराच काळ पहिल्या स्थानावर होता. त्यावेळी रोहित शर्मा 882 पॉइंट मिळवत दुसऱ्या स्थानी होता.
रोहित शर्मा भारतासाठी कसोटी आणि वनडे संघातील प्रमुख फलंदाज आहे. कसोटी रँकिंगमध्ये रोहित सहाव्या स्थानावर आहे.
रोहित शर्मानं गेल्या काही दिवसांपासून फलंदाजीची शैली बदलली आहे. भारताच्या डावाची सुरुवात करताना रोहित शर्मा आक्रमकपणे विरोधी संघांच्या गोलंदाजांची धुलाई करताना पाहायला मिळतो.