Jasprit Bumrah : एकीकडे रोहितचा तांडव! दुसरीकडे बुमराहच्या फिटनेसबद्दल मोठी अपडेट, कधी उतरणार मैदानात?

एकीकडे टीम इंडियाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार रोहित शर्माने शतक झळकावून अनेक महिन्यांपासून सुरू असलेला दुष्काळ संपवला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दुसरीकडे भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.

वृत्तानुसार, बुमराहच्या स्कॅन रिपोर्टवर अंतर्गत चर्चा झाली आहे आणि त्याला शारीरिक हालचाली पुन्हा सुरू करण्यास सांगण्यात आले आहे.
अशा परिस्थितीत बुमराह जिममध्ये व्यायामासोबत हलकी गोलंदाजी सुरू करू शकतो.
असे असूनही, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याचा सहभाग अद्याप निश्चित झालेला नाही. त्यामुळे तो कधी मैदानात उतरणार हे आता सांगता येणार नाही.
पण, भारतीय बोर्ड बुमराहबाबत शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहण्याची रणनीती अवलंबत आहे.
2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्या जखमी झाल्यानंतर त्याच्या जागी खेळाडू आणण्यासाठी बोर्डाने असेच काहीसे केले होते.