डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ ट्रेडनं विदेशी गुंतवणूकदार घाबरले, भारतीय शेअर बाजारातून काढता पाय, 6 दिवसात 7342 कोटी काढून घेतले

अमेरिकेनं चीन, मेक्सिको आणि कॅनडातून आयात होणाऱ्या गोष्टींवर टॅरिफ लावलं आहे. त्याला उत्तर देत या देशांनी देखील अमेरिकेवर टॅरिफ लावण्याची घोषणा केलीय. जगभरात टॅरिफ ट्रेड वॉरच्या संकटाचं सावट आहे. यामुळं भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणारे विदेशी गुंतवणूकदार घाबरले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
फेब्रुवारीत आतापर्यंत 6 दिवस शेअर बाजार सुरु होता. या काळात विदेशी गुंतवणूकदारांनी 7342 कोटी रुपये काढून घेतले आहेत. जानेवारी महिन्यात 78027 कोटी रुपये विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतले होते. तर, डिसेंबर महिन्यात ही रक्कम 15446 कोी रुपये होती.

जागतिक अस्थिरतेचा विपरीत परिणाम शेअर बाजारावर होण्याची शक्यता असल्यानं गुंतवणूकदार जोखीम स्वीकारण्याच्या तयारीत नाहीत. त्यामुळं भारतासारख्या विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेतील शेअर बाजारातून पैसे काढून घेतले जात आहेत. भारताचं चलन रुपया डॉलरच्या तुलनेत कमजोर झालं आहे. भारतीय रुपया एक डॉलरच्या तुलनेत 87 रुपयांवर पोहोचला आहे.
रुपया घसरल्यानं विदेशी गुंतवणूकदारांचं नुकसान होत आहे. यामुळं विदेशी गुंतवणूकदारंचा नफा घटतोय. जोखीम अन् संकट टाळण्यासाठी ते समभागांची विक्री करत आहेत.
आरबीआयनं रेपो रेट कमी केल्यानं विदेशी गुंतवणूकदारांकडून केल्या जाणाऱ्या शेअरच्या विक्रीत घट होण्याचा अंदाज असेल. भारताचा आर्थिक विकास आणि कंपन्यांच्या कामगिरीतील सुधारणा यावर भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांची गुंतवणूक अवलंबून आसेल. 2024 मध्ये भारतीय शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदारांकडून करण्यात आलेली रक्कम मोठ्या प्रमाणात कमी झाली होती.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)