Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहचा सन्मान, 2024 च्या ऑस्ट्रेलियनं XI च्या कॅप्टनपदी निवड, दमदार कामगिरीची अनोखी दखल
क्रिकेट ऑस्ट्रेलियानं 2024 ची बेस्ट टेस्ट प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा यामध्ये सन्मान करण्यात आला आहे. या संघाचं नेतृत्व जसप्रीत बुमराहकडे देण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविशेष बाब म्हणजे क्रिकेट ऑस्ट्रेलियानं त्यांच्या टीमचा कॅप्टन पॅट कमिन्सला बेस्ट कसोटी प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान दिलेलं नाही.
जसप्रीत बुमराहनं 2024 मध्ये 13 कसोटी सामन्यांमध्ये 71 विकेट घेतल्या. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं म्हटलं की जसप्रीत बुमराहची ही कामगिरी एखाद्या कॅलेंडर वर्षातील वेगवान गोलंदाजाच्या सर्वोत्तम कामगिरीपैकी एक आहे. डेल स्टेननं 2008 मध्ये 74 विकेट घेतल्या होत्या.
जसप्रीत बुमराहनं प्रत्येक ठिकाणी चांगली कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना त्यानं त्रस्त केलं आहे. भारतात त्यानं इंग्लंड विरुद्ध 19 विकेट घेतल्या, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियानं म्हटलं आहे. 2024 मध्ये जसप्रीत बुमराहनं भारताला पर्थ कसोटीत विजय मिळवून दिला.
क्रिकेट ऑस्ट्रेलियानं यशस्वी जयस्वालला सलामीवर म्हणून स्थान दिलं आहे. त्यानं 15 कसोटी सामन्यांमध्ये 1478 धावा केल्या. भारताच्या एखाद्या सलामीवीरानं कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम बुमराहच्या नावावर आहे.
यशस्वी जयस्वाल, बेन डकेट, जो रुट, रचिन रविंद्र, हॅरी ब्रुक, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मॅट हेन्री, जसप्रीत बुमराह (कॅप्टन), जोश हेजलवूड, केशव महाराज.