Jasprit Bumrah Sanjana Ganesan Marriage: जसप्रीत बुमराह, संजना गणेशन सात फेऱ्यांत अडकले, पहा फोटो
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आज गोव्यात टीव्ही अँकर संजना गणेशनबरोबर विवाहबंधनात अडकला. त्यांच्या लग्नाची लेटेस्ट फोटो समोर आली आहेत, ज्यात दोघेही खूप आनंदी आणि सुंदर दिसत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनाचे सर्व नियम पाळून हा विवाहसोहळा पार पाडला. यामुळे लग्नाच्या कार्यक्रमात अगदी जवळचे लोकच सामील झाले होते. बुमराह आणि संजना गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.
मॅचिंग वेडिंग ऑफिटमध्ये दोघेही अप्रतिम दिसत आहेत. दोघांनीही या खास दिवसासाठी बेबी गुलाबी रंग निवडला आहे. जसप्रीत गुलाबी रंगाच्या शेरवानीमध्ये दिसत आहे तर संजनानेही एक सुंदर लेहंगा परिधान केला होता.
तिच्या लेहेंगामध्ये लाल रंगाच्या फुलांच्या डिझाइनसह गुलाबी रंगाची रचना उठून दिसत आहे.
जसप्रीत बुमराह हा टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आहे तर संजना मीडिया क्षेत्रातील आहे. ती एक टीव्ही अंकर आहे.
संजनाने प्रीमियर बॅडमिंटन लीगलाही होस्ट केलं आहे. आयपीएलमध्ये संजना शाहरूख खानच्या केकेआरच्या द नाईटक्लब शोची अँकरही होती.