IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं

आयपीएलच्या यंदाच्या 18 व्या हंगामातील लिलाव प्रक्रिया पार पडल्यानंतर उत्सुकता लागली होती ती आयपीएलच्या वेळापत्रकाची, अखेर बीसीसीआयकडून आज आयपीएल 2025 चे वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
यंदाचा आयपीएलचा हंगाम 22 मार्च ते 25 मे दरम्यान खेळवला जाणार आहे. त्यावेळी आयपीएलचा पहिला सामना 22 मार्च रोजी KKR विरुद्ध RCB असा पाहायला मिळणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डनवर स्टेडियमवर हा सामना होणार आहे.

IPL 2025 चा सर्वात मोठा सामना 23 मार्च रोजी होणार आहे. या दिवशी आयपीएलमधील दोन सर्वात मोठे संघ भिडणार आहेत. 23 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. यंदाच्या मोसमात दोन्ही संघांमध्ये दोन लढती होतील.
यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण 74 सामने 13 वेगवेगळ्या ठिकाणी खेळवले जाणार आहेत. प्रसिद्ध वेळापत्रकानुसार 23 मार्च ते 15 मे पर्यंत मुंबई इंडियन्सचे सामने जाहीर झाले आहेत
यंदाच्या आयपीएल हंगामातील वेळापत्रकानुसार मुंबई इंडियन्सच्या एकूण 14 सामन्यांचं शेड्युल जाहीर झालं आहे. त्यामध्ये, आयपीएलमधील सर्वच संघांसोबत मुंबईची लढत होत आहे.
यंदाच्या हंगामात मुंबईच्या संघाचा कर्णधार हार्दीक पंड्या असून चेन्नईच्या टीमचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आहे. विशेष म्हणजे या दोन्ही संघात रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनीसारखे दिग्गज खेळाडू खेळणार आहेत.
आयपीएल सामन्यांचं वेळापत्र एबीपीच्या वाचकांसाठी शेअर करण्यात आलं आहे. कोणत्या संघाचा कोणाशी कधी सामना होणार हे सर्व या वेळापत्रकात पाहायला मिळेल