Ajit Pawar : अजित पवारांनी राजीनामाच्या प्रश्नावर दोन वाक्यात अंग काढून घेतलं, थेट धनंजय मुंडेंना स्वत:चा दाखला देत आवाहन

Ajit Pawar on Dhananjay Munde, Mumbai : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची जवळपास अडिच महिन्यांपूर्वी क्रूरपणे हत्या झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं. विरोधी पक्षांसह महायुतीतील अनेक नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले.

धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडला अटक करुन मोक्का देखील लावण्यात आला. त्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले.
राष्ट्रवादीतील प्रकाश सोळंके देखील धनंजय मुंडेंवर आरोप करण्यात मागे नव्हते.
महायुतीतील नेते रामदास आठवले यांच्यापासून शिंदेंच्या शिवसेनेतील काही नेत्यांनी थेट राजीनाम्याची मागणी देखील केली.
राज्यभरातून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत पहिल्यांदाच रोखठोक भूमिका मांडली आहे.
अजित पवार म्हणाले, राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजय मुंडेंनी ठरवावं.
सिंचन घोटाळ्यावरुन माझ्यावर देखील आरोप करण्यात आले होते. त्यावेळी मी राजीनामा दिला होता.
पुरावा नसेल म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला नसेल असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.