Pushpa 2 पासून Singham Again पर्यंत; बॉक्स ऑफिस हादरवण्यासाठी येतायत जबरदस्त चित्रपट; रिलीज डेट काय?
Upcoming Movies 2024: यंदाच्या वर्षात नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये अनेक बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहेत. अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटांची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

Upcoming bollywood Movies
1/9
2024 च्या उरलेल्या तीन महिन्यांत अनेक उत्कृष्ट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 2024 आणि 2025 मध्ये येणाऱ्या चित्रपटांबद्दल देखील सांगणार आहोत.
2/9
रोहित शेट्टीच्या सिंघम अगेन या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्याला खूप पसंती मिळत आहे. हा चित्रपट 1 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असून यात अजय देवगण व्यतिरिक्त करीना कपूर, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ, अर्जुन कपूर, रणवीर सिंह आणि अक्षय कुमार दिसणार आहेत.
3/9
कार्तिक आर्यनचा हॉरर-कॉमेडी चित्रपट भूल भुलैय्या 3 दिवाळीला रिलीज होणार आहे. यावर्षी 1 नोव्हेंबरला चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज केला जाणार आहे.
4/9
अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित चित्रपट पुष्पा 2: द रुल या वर्षी 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची आधीच चर्चा सुरू असून चाहते त्याची वाट पाहत आहेत.
5/9
छावा हा विकी कौशलचा मोस्ट अवेटेड चित्रपट. या चित्रपटात अक्षय खन्ना आणि रश्मिका मंदाना देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट यावर्षी 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे, जो अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 चित्रपटाला थेट टक्कर देणार आहे.
6/9
अक्षय कुमार आणि अर्शद वारसीचा चित्रपट जॉली एलएलबी 3 ची रिलीज डेट 11 एप्रिल 2025 आहे. या दोन्ही अभिनेत्यांच्या अभिनयाचा तडका या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
7/9
दबंग भाईजान सलमान खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट सिकंदर पुढच्या वर्षी ईदला रिलीज केला जाणार आहे. चित्रपटाची शुटिंग सुरू झाली असून अजून रिलीज डेट कन्फर्म करण्यात आलेली नाही.
8/9
साजिद नाडियावालाचा चित्रपट हाऊसफुल्लची रिलीज डेट 6 जून 2025 लॉक करण्यात आली आहे. अक्षय कुमारसह अनेक सेलिब्रिटी या चित्रपटात दिसून येणार आहेत.
9/9
नितेश तिवारी यांच्या रामायणावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच्या शुटिंग दरम्यानचे अनेक फोटो समोर आले आहेत. चित्रपटात रणवीर कपूर श्रीराम आणि साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे. 2025 वर्षाच्या दिवाळीत हा चित्रपट रिलीज केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Published at : 08 Oct 2024 06:55 AM (IST)