IPL 2025 च्या हंगामात मोठ्या घडामोडी, पाच संघांचे कॅप्टन बदलणार, शुभमन गिल ते डुप्लेसिस यादीत आणखी कोण असणार?
गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुभमन गिलनं हार्दिक पांड्यानंतर ही जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, त्याच्या नेतृत्त्वात संघ प्लेऑफ पर्यंत देखील पोहोचला नव्हता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलखनौ सुपर जाएंटसचा कर्णधार म्हणून केएल राहुल 2022 पासून काम करत आहे. पहिल्या दोन हंगामात लखनौच्या संघानं प्लेऑफमध्ये धडक दिली होती. मात्र, 2024 च्या आयपीएलमध्ये लखनौला चांगली कामगिरी करता आली नव्हती.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आतापर्यंत एकदाही विजेतेप मिळवता आलेलं नाही. फाफ डु प्लेसिस आरसीबीचं नेतृत्व करत होता. बंगळुरुला देखील नवा कर्णधार मिळण्याची शक्यता आहे.
शिखर धवन हा पंजाब किंग्जचं नेतृत्त्व करतो. काही दिवसांपूर्वी त्यानं आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळं पंजाब किंग्जला नवा कॅप्टन मिळू शकतो.
कोलकाता नाईट रायडर्सला श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात 2024 च्या हंगामात विजेतेपद मिळालं होतं. काही मिडिया रिपोर्टनुसार केकेआरनं सूर्यकुमार यादवला कर्णधार पदाची ऑफर दिल्याच्या चर्चा होत्या. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
आयपीएलच्या 2025 च्या हंगामात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. आयपीएलपूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामध्ये अनेक खेळाडू संघ बदलण्याची शक्यता आहे. खेळाडूंचे संघ बदलले गेल्यास कर्णधार देखील बदलले जाण्याची शक्यता आहे.