IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असू शकते भारताची प्लेइंग-11
भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळल्या जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबर रोजी होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नईत, तर दुसरा सामना कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे. दोन्ही सामने सकाळी 9.30 वाजता सुरू होतील.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात टीम इंडिया विजयी घोडदौड करत आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात एकूण 13 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये टीम इंडियाने 11 सामने जिंकले आहेत, तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. बांगलादेश पहिल्या विजयाची वाट पाहत आहे.
भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा बांगलादेशविरुद्ध संघात पुनरागमन करू शकतो. टी-20 वर्ल्ड कपपासून तो मैदानाबाहेर होता. मात्र, टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रवींद्र जडेजाने टी-20 फॉरमॅटला अलविदा केला.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरणार आहे. रोहित व्यतिरिक्त यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, शुभमन गिल, केएल राहुल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांचा संघात समावेश केला जाऊ शकतो.