Inside Photos : एक महल हो सपनों का.. सचिन तेंडुलकरचं आलिशान घर!
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेटविश्वात अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. केवळ क्रिकेटच्या मैदानातच नाही तर बिझनेसमध्येही सचिनचं नाव आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या कमाईचा मोठा भाग आलिशान घरावर खर्च केला आहे. पाहूया सचिन तेंडुलकरच्या घराचे फोटो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसचिन तेंडुलकरचं घर वांद्रे पश्चिमेच्या पेरी क्रॉस रोडवर आहे. याच घरात सचिन कुटुंबासह राहतो. हे घर मास्टरब्लास्टरने 2007 मध्ये 39 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं.
सचिन तेंडुलकरचं हे घर 6000 चौरस फूट क्षेत्रात बनलं आहे. खरंतर हे घर 1926 मध्ये बांधलं होतं. त्यामुळे या घराचं रेनोव्हेशन करण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागला.
घरात अनेक मजले असून दोन बेसमेंट आहेत. घरातच शानदार गार्डनही आहे, जे जगभरातील विविध रोपांनी सजवलं आहे.
सचिन तेंडुलकर आणि कुटुंबीय अतिशय धार्मिक आहेत. त्यामुळे त्याच्या घरातील एक मोठा भाग मंदिरासाठी ठेवलेला आहे.
फोटो पाहिल्यानतंर समजू लक्षात येईल की सचिन तेंडुलकरच्या घरात इंटीरियरपासून फर्निचरपर्यंत प्रत्यके गोष्ट अतिशय खास आहे.
सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर आपल्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतो, ज्यात त्याच्या घराची झलकही पाहायला मिळते.
यासाबोतच सचिन आणि अंजली यांना पेंटिंगमध्ये विशेष रस आहे. त्यांच्या घरातील भिंतींवर अनेक पेंटिग दिसतात.
घरातील सर्वात खास ठिकाणांपैकी हे गार्डनही आहे.
यासोबतच घराचा व्ह्यू प्रोफेशनल देखील आहे. इथे मास्टरब्लास्टरच्या मुलाखती इथेच होतात.
फोटो पाहिल्यानंतर घरात वुड वर्कपासून फ्लोरिंग प्रत्येक गोष्टीवर बारकाईने काम केलं आहे.
सचिन आणि अंजली तेंडुलकर यांना दोन मुलं आहे. मुलीचं नाव सारा असून मुलाचं नाव अर्जुन आहे.
अर्जुन सध्या क्रिकेट विश्वात करिअर करत आहे, तर सचिनची मुलगी सारा नुकतीच ग्रॅज्युएट झाली आहे.
सर्व फोटो सचिन तेंडुलकरच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन घेण्यात आले आहेत.