सकाळच्या ब्रेकफास्टपासून रात्रीच्या जेवणापर्यंत दीपिका पादुकोणचा पूर्ण दिनक्रम

संग्रहित छायाचित्र

1/6
सध्याच्या काळात दीपिका पादुकोणचे नाव बॉलीवूडच्या अव्वल अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. तिने आपल्या कारकीर्दीच्या अवघ्या 10 वर्षांत हे स्थान मिळवलंय. आज इंडस्ट्रीत येणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी दीपिका पादुकोण रोल मॉडेल बनली आहे. (फोटो - इंस्टाग्राम)
2/6
यामुळेच चाहत्यांना त्यांच्या आवडत्या स्टार्सविषयी अधिकाधिक जाणून घ्यायचे आहे. दीपिका सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करीत असते? तिचा रोजचा दिनक्रम काय आहे, वगैरे. (फोटो - इंस्टाग्राम)
3/6
एका मुलाखतीत स्वत: दीपिकाने तिची दिनक्रम सांगितलाय. ज्याची सुरुवात दक्षिण भारतीय ब्रेकफास्टपासून झाली. ज्यामध्ये दीपिकाला इडली खूप आवडते. म्हणून ती दररोज इडली खाते आणि तिचा दिवस इडली खाल्याशिवाय सुरू होत नाही. (फोटो - इंस्टाग्राम)
4/6
ब्रेकफास्टनंतर दीपिका जिममध्ये जोरदार घाम गाळते, जे नेहमीच तिला फिट आणि फ्रेश ठेवते. जिमनंतर ती भाजीपाला आणि फळांचा ज्यूस पिण्यास कधीही विसरत नाही. कारण हे तिच्या चमकणार्‍या त्वचेचे रहस्य आहे. (फोटो - इंस्टाग्राम)
5/6
जिम आणि ब्रेकफास्टनंतर दीपिकाला शूटला जायचे असेल, एखादी मिटिंग घ्यायची असेल किंवा एखाद्या चित्रपटाचे कथा ऐकायची असेल तर ती ते करते. पण, दीपिकाला मीटिंग नसल्यास ती तिच्या घर आणि ऑफिसशी संबंधित महत्त्वाची काम करते. (फोटो - इंस्टाग्राम)
6/6
या कामं आटोपल्यानंतर दीपिका दुपारचे जेवण घेते आणि दुपारच्या जेवणानंतर ती पुन्हा महत्त्वाची कामे पूर्ण करते. संध्याकाळी दीपिका तिला पाहिजे ते करते, ती तिच्या पालकांशी फोनवर बोलते, सोशल मीडिया किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर एखादा आवडता चित्रपट पाहते, मसाज करुन घेते. आणि मग डिनर. अशातच दीपिकाचा दिवस संपतो. (फोटो - इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola