In Pics : टीम इंडियाचा झिम्बाब्वेवर मोठा विजय, 10 गडी राखून दिली मात
भारत सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असून पहिल्या एकदिवसीय सामन्यात आधी उत्तम गोलंदाजी आणि नंतर दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने 10 विकेट्सने विजय मिळवला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया विजयासह भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे.
झिम्बाब्वेच्या हेरारे स्पोर्ट्स क्लब येथे पार पडलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातील या विजयात भारताच्या गोलंदाजांसह फलंदाजांनी उत्तम कामगिरी केली.
सामन्यात सर्वप्रथम म्हणजे नाणेफेक जिंकत प्रथम भारताने गोलंदाजी घेतली. दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णासह फिरकीपटू अक्षर पटेलच्या भेदक माऱ्यापुढं झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले.
ज्यामुळं झिम्बाब्वेचा संघ 40.3 षटकात 189 धावांवर ऑलआऊट झाला. झिम्बाब्वेकडून कर्णधार रेगीज चकाब्वानं सर्वाधिक 35 धावांची खेळी. रेगीज चकाब्वानंतर रिचर्ड येनगारावा (33 धावा) आणि ब्रॅडली इवांसनं (नाबाद 34 धावा) अखेरिस फटकेबाजी केली.
190 धावांचे आव्हान गाठण्यासाठी मैदानात आलेल्या भारताकडून सलामीवीर शुभमन आणि शिखर या दोघांनी अगदी अप्रतिम अशी सुरुवात भारताला करुन दिली.
शुभमनने 72 चेंडूत नाबाद 82 तर शिखरने 113 चेंडूत नाबाद 81 धावा केल्या.
ज्यामुळे 30.5 षटकातच भारताने 192 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यामुळे भारताने 10 गडी राखून विजय मिळवला या विजयामुळे भारत मालिकेत 1-0 च्या आघाडीवर पोहोचला आहे.
सामनावीर म्हणून उत्तम गोलंदाजी करणाऱ्या दीपक चहरला पुरस्कृत करण्यात आलं.
आता दुसरा सामना शनिवारी 20 ऑगस्ट रोजी पार पडेल.