Health Tips : ...यासाठी भिजवलेले बदाम रोज खावेत
भिजवलेले बदाम खाण्याचे एक नाही तर अनेक फायदे आहेत. यापैकी काही फायदे जाणून घेऊयात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबदामाच्या तपकिरी त्वचेत, जी त्वचा बदामासारखी चिकटलेली असते, त्यात टॅनिन नावाचे तत्व असते. ज्यामुळे बदामाच्या पचनामध्ये त्रास होतो.
टॅनिनमुळे, बदामाचे सर्व गुणधर्म शरीराला मिळत नाहीत कारण ते बदामाद्वारे एन्झाईम सोडण्यात अडथळा आणतात. त्यामुळे बदाम खाल्ल्यानंतरही शरीराला त्याचे सर्व गुणधर्म मिळत नाहीत.
बदाम पाण्यात भिजवल्याने त्याची त्वचा सोलणे सोपे होते आणि हे बदाम खाल्ल्याने त्यातील सर्व पोषक तत्वे देखील मिळतात.
भिजलेले बदाम खाल्ल्याने शरीरात साठलेली चरबीही कमी होण्यास मदत होते. कारण भिजलेले बदाम लिपेस नावाचे एन्झाइम सोडते, जे शरीरात चरबी जमा होण्यास प्रतिबंध करते.
भिजलेले बदाम वजन कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहेत. कारण त्यातून बाहेर पडणारे एन्झाइम्स आणि कार्ब्स पोट दीर्घकाळ भरलेले राहतात. अशा स्थितीत तुम्ही अतिरिक्त कॅलरीज खाण्यापासून वाचता आणि हळूहळू तुम्ही वजन नियंत्रित ठेवू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.