भारताच्या पोरींची कमाल, इंग्लडचा 136 धावांत खुर्दा
नवी मुंबईतील डी. वायय पाटील स्टेडियमवर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. दीप्ती शर्माने 5 बळी घेतले. स्नेह राणाला 2 बळी मिळाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंग्लंडकडून नॅट सायव्हर ब्रंटने अर्धशतक झळकावले. भारताच्या पहिल्या डावानंतर ब्युमॉंट आणि डंकली सलामीला आल्या. डंकली जास्त वेळ क्रीजवर टिकू शकला नाही. 10 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 11 धावा करून ती बाद झाली.
रेणुका सिंहने तिला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. 35 चेंडूत 10 धावा करून ब्युमॉंट बाद झाली. कर्णधार हीदर नाईटलाही विशेष काही करता आले नाही. 23 चेंडूत 11 धावा करून ती बाद झाली. पूजा वस्त्राकरने नाइटला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
नॅट सायव्हरने चांगली फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. तिनं 70 चेंडूंचा सामना करत 59 धावा केल्या. सायव्हरच्या या खेळीत 10 चौकारांचा समावेश होता. तिला स्नेह राणाने बाद केले. डेनियल व्याट 19 धावा करून बाद झाली.
दीप्ती शर्माने तिला बाद केले. दीप्तीने यष्टिरक्षक फलंदाज अॅमी जोन्सलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. जोन्स 12 धावा करून बाद झाली. अशाप्रकारे संपूर्ण संघ 136 धावांवर गडगडला. इंग्लंडचा संघ केवळ 35.3 षटकेच खेळू शकला.
टीम इंडियाकडून गोलंदाजी करताना दीप्ती शर्माने 5 बळी घेतले. त्याने 5.3 षटकात फक्त 7 धावा देत 4 मेडन षटके टाकली. स्नेह राणाने 6 षटकात 25 धावा देत 2 बळी घेतले. रेणुका आणि पूजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. राजेश्वरी गायकवाडलाएकही यश मिळाले नाही. तिने 6 षटकात 25 धावा दिल्या.