Children Health Tips : मुलांना मीठ किंवा साखर का देऊ नये? जाणून घ्या या मागचे कारण

6 महिन्यांपर्यंत बाळाला फक्त आईच्या दुधापासूनच संपूर्ण पोषण मिळत असते. दूध सोडल्यानंतर, जेव्हा तो काही घट्ट अन्न घेऊ लागतो, तेव्हा त्याच्यासाठी पौष्टिक अन्नपदार्थ तयार केले पाहिजेत.(Photo Credit : Pexels)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पण अनेक वेळा तुम्ही त्याच्यासाठी मीठ किंवा साखर भरपूर प्रमाणात वापरून पदार्थ तयार करतात. तुम्हला माहितीये का? ते त्याच्या आरोग्यासाठी किती हानिकारक ठरू शकतात. एका वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना मीठ आणि साखर अजिबात देऊ नये. त्यामुळे त्यांच्या किडनी, पचनसंस्था आणि हृदयावर गंभीर परिणाम होऊ शकतात.(Photo Credit : Pexels)

तसेच मुलांना फक्त एक वर्षभर स्तनपान द्यावे आणि नंतर लापशी, खिचडी, ओट्स असे चविष्ट आणि पौष्टिक अन्न तेही मीठ किंवा साखरे शिवाय द्यावे.(Photo Credit : Pexels)
एक वर्षानंतर, मीठ हळूहळू त्याच्या आहारात समाविष्ट केले जाऊ शकते. परंतु मिठाचे सेवन सावधगिरीने आणि कमीत कमी प्रमाणात केले पाहिजे.(Photo Credit : Pexels)
मुलांची किडनी अजून पूर्ण विकसित झालेली नसते. एक वर्षाच्या वयापर्यंत मुलांची किडनी खूपच लहान आणि कमकुवत असते.(Photo Credit : Pexels)
या काळात त्यांना मीठ दिल्यास ते त्यांच्या किडनीसाठी त्रासदायक बनू शकते. मिठामुळे किडनीवर जास्त दबाव पडतो. मुलांची कमकुवत किडनी हा दबाव सहन करू शकत नाही. यामुळे किडनीचे नुकसान होऊ शकते.(Photo Credit : Pexels)
जेव्हा मुले जास्त प्रमाणात साखर खातात तेव्हा त्यांच्या शरीरातील प्रथिने नीट पचत नाहीत. प्रथिने शरीरासाठी खूप महत्त्वाची असतात.(Photo Credit : Pexels)
प्रथिने हे हाडे, स्नायू आणि त्वचा मजबूत ठेवण्यास मदत करतात. तसेच जेव्हा प्रथिने व्यवस्थित पचत नाहीत, तेव्हा आपली हाडे आणि स्नायू कमकुवत होतात.(Photo Credit : Pexels)
जास्त साखर खाल्ल्याने त्वचेची आणि रक्तवाहिन्यांची लवचिकता देखील कमी होऊ शकते. यामुळे लहानपणापासूनच मुलांचे दात खराब होऊ शकतात किंवा त्यांचे डोळे कमकुवत होऊ शकतात.(Photo Credit : Pexels)
म्हणून मुलांना साखर देणे शक्यतो टाळावे. त्यांच्यासाठी उसाचा रस किंवा मध पुरेसे आहे. त्यामुळे 1 वर्षापर्यंत मुलांना मीठ किंवा साखर देऊ नये.(Photo Credit : Pexels)