टी 20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय महिला संघ श्रीलंकेत दाखल
तीन व नडे आणि तीन टी20 सामन्याच्या मालिकेसाठी भारताचा महिसा संघ श्रीलंकेत पोहचलाय. भारतीय संघ श्रीलंकेत पोहचल्यानंतर बीसीसीआयने काही फोटो पोस्ट केलेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ 23 जूनपासून टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. मिताली राज आणि झूलन गोस्वामी यासारख्या खेळाडूंशिवाय भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर गेलाय. मिताली राजने नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
टी20 मालिकेला 23 जूनपासून सुरुवात होतेय. दूसरा टी 20 सामना 25 जून आणि तीसरा सामना 27 जून रोजी होणार आहे.
एकदिवसीय मालिकेलीत पहिला सामना एक जुलै रोजी होणार आहे. त्यानंतर 4 जुलै आणि तिसरा सामना सात जुलै रोजी होणार आहे.
एकदिवसीय सामन्यासाठी संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिक भाटिया (विकेटकिपर), एस मेघना, दिप्ती शर्मा, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, सिमरन बहादुर, रिचा घोष (विकेटकिपर), पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणुका सिंह, तानिया भाटिया (विकेटकिपर), हरलीन देओल.
टी20 मालिकेसाठी भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकिपर), एस मेघना, दीप्ति शर्मा, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड़, सिमरन बहादुर, रिचा घोष (विकेटकिपर), पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणुका सिंह, जेमिमा रोड्रिग्स, राधा यादव.