PHOTO : महाराष्ट्राच्या चेरापुंजीतील मुख्य धबधबा प्रवाहित, आंबोलीत पर्यटकांची गर्दी
कोकणातील वर्षा पर्यटनाचं मुख्य केंद्रबिंदु आणि महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीचा मुख्य धबधबा प्रवाहित झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी देशभरातील पर्यटकांचा ओघ आता आंबोलीत सुरु झाला आहे.
जैवविविधतेने संपन्न असलेल्या आंबोलीत पावसाळ्यात एक आगळंवेगळं रुप पाहायला मिळतं.
पावसाळ्यातील आंबोलीत रुप हे डोळ्याचं पारणं फेडणारं स्वर्गीय नजरा देणारं असतं.
वातावरणात कमालीचा गारवा, दाट धुके, पाऊस आणि फेसाळणारे धबधबे हे अचंबित करणारं रुप आपल्याला आंबोलीत पाहायला मिळतं.
जेवढी आंबोली दिवसा मनमोहक आणि विस्मयकारी आहे तेवढीच रात्री थक्क करणारी आहे.
विविध प्रकारचे साप, बेडूक, खेकडे आणि प्राणी या आंबोलीच्या या जंगलात पाहायला मिळतात.
म्हणूनच देशभरातील पर्यटकांचं फेव्हरेट आणि हॉट डेस्टिनेशन आंबोली आहे.
दरवर्षी लाखो पर्यटक आंबोलीत हजेरी लावतात. मात्र गेली तीन वर्षे आंबोलीच्या पर्यटनाला खीळ बसली आहे.