'डॉन'साठी शाहरुख खान नाहीतर, 'हा' सुपरस्टार होता, फरहान अख्तरती पहिली पसंत; पण तरी 'किंग खान'च कसा झाला डॉन?
बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान म्हणजे, अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत. अलिकडेच 'जवान', 'पठाण', 'डंकी' यांसारख्या नुकत्याच आलेल्या चित्रपटांतून त्यानं नवख्या स्टार्सनाही मात दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशाहरुखनं आजवर साकारलेल्या भूमिकांपैकी डॉन म्हणजे, सर्वांच्या लक्षात राहिलेली भूमिका. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या चित्रपटात शाहरुख खान कधीच निर्मात्यांची पहिली पसंती नव्हता.
डॉनची भूमिका साकारण्याआधीच शाहरुख खान हे नाव बॉलिवूडच्या प्रस्थापित नावांपैकी एक होतं. पण, या चित्रपटानं त्याच्या कारकिर्दीला ॲक्शनपॅक्ड चित्रपटांकडे नवी दिशा दिली आहे. शाहरुखची स्टाईल आणि अँटी-हिरो कॅरेक्टरमधलं उत्कृष्ट काम पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
या चित्रपटाची रंजक गोष्ट म्हणजे, फरहान अख्तर जेव्हा या चित्रपटाचा रिमेक बनवण्याचा विचार करत होता, तेव्हा त्याच्या मनात ज्या अभिनेत्यानं ही व्यक्तिरेखा साकारावी असा विचार त्याच्या मनात आला, तो म्हणजे हृतिक रोशन.
एका भेटीत त्यानं या चित्रपटात हृतिक रोशनला कास्ट करण्याची इच्छाही व्यक्त केली होती.
एका पॉडकास्टमध्ये बोलताना फरहान अख्तरनं सांगितलं की, मी आणि ऋतिकनं लक्ष्यमध्ये एकत्र काम केलं होतं. आम्हा दोघांमध्ये खूप खास बॉन्डिंग होती.
फरहान अख्तरनं सांगितलं होतं की, मी ऋतिककडे गेलो आणि त्याला सांगितलं की, मला डॉनचा रिमेक बनवायचा आहे. मी त्याला सांगितलं की, आधी मी लिहितो आणि त्यानंतर तुझ्याकडे घेऊन येतो. त्यावर तो म्हणालेला... चांगलं आहे मित्रा, मी तयार आहे.
फरहान अख्तरनं सांगितलं की, जेव्हा मी लिहायला सुरुवात केली, त्यावेळी माझ्या डोक्यात ज्याचा चेहरा पिरत होता, तो शाहरुख खान होता. फरहान खान म्हणतो की, आम्ही एकत्र काम केलं आहे, कॉमन फ्रेंड्ससोबत पार्टीसुद्धा केली आहे. शाहरुख खान रियल लाईफमध्ये खूपच वेगळा होता. त्याचा सेन्स ऑफ ह्युमर खूपच भारी आहे. मग माझ्या डोक्यात आला की, ही व्यक्तीच यासाठी परफेक्ट आहे.
फरहान सांगतो की, यानंतर मी संकोचपणे हृतिकला फोन केला आणि सांगितलं की, मी तुला सांगितलेली चित्रपटाची कथा मी लिहित आहे. पण जितकं लिहितो तितकं या भूमिकेसाठी शाहरुख खानकडे जावं असं वाटतंय.
यानंतर हृतिकनं फरहानला सांगितलं की, फरहान तुला चित्रपट बनवायचा आहे आणि तोही उत्तम पद्धतीनं. तुला योग्य वाटतंय तिकडे जा. माझी काळजी करू नकोस.