Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shani Dev : एकामागोमाग येतायत संकटं? साडेसाती दूर करण्यासाठी शनिवारी करा 'हे' झटपट उपाय; अडचणी होतील क्षणात दूर
1. शनिवारी कोणत्याही शनि मंदिरात जाऊन मोहरीचे तेल, काळे तीळ आणि लोखंडी खिळे मिसळून शनिदेवाला अर्पण केल्यास साडेसातीच्या प्रभावापासून आराम मिळतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2. पिंपळाच्या झाडात शनिदेव वास करतात, असं म्हणतात. शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावून शनिदेवाची पूजा केल्याने विशेष आशीर्वाद प्राप्त होते. यासोबतच शनि स्तोत्राचे पठण केल्याने साडेसातीपासून आराम मिळतो.
3. शनिवारी लोखंड, काळे तीळ, काळी उडीद डाळ किंवा काळे कपडे दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. शनीच्या साडेसातीत हा उपाय केल्याने तुम्ही शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून दूर राहू शकता.
4. शनिवारी सूर्याला जल अर्पण करावं, याने जीवनात शुभ गोष्टी घडतात. या दिवशी चुकीचं किंवा अयोग्य काम टाळा.
5. शनिवारी मासे, पक्षी आणि प्राण्यांना खायला दिल्याने शनीचा त्रास कमी होतो. यासोबतच साडेसतीच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळतो.
6. शनिवारी मुंग्यांना पीठ किंवा साखर दिल्यानेही साडेसातीचा प्रभाव कमी होतो.
7. तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार गरजू लोकांना दान केलं तरी शनिदेव प्रसन्न होतात आणि त्यांचा वाईट प्रभाव कमी होतो.
8. शनिवारी हनुमानाची पूजा केल्याने, हनुमान चालिसा पठण केल्याने शनीचा त्रास दूर होतो. सर्व अडचणी दूर होतात.
9. शनिवारी सकाळी आणि संध्याकाळी जेवणात काळं मीठ आणि काळी मिरी वापरा, यामुळे देखील सर्व समस्या दूर राहतात.
10. शनिवारी नियमितपणे सकाळी पक्ष्यांना धान्य आणि पाणी दिल्याने शनिदेव प्रसन्न होतात, तुम्हाला आशीर्वाद देतात आणि सर्व अडचणी दूर करतात.