Ind Vs Aus | ऑस्ट्रेलियाला मायदेशात पराभूत करण्यासाठी टीम इंडिया सज्ज; कसून सराव

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी साधली आहे. चौथा कसोटी सामना जिंकणारा संघ मालिका आपल्या नावे करणार आहे. टीम इंडियाने ज्याप्रकारे तिसरा कसोटी समाना ड्रॉ केला होता. त्यामुळे संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडू ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायदेशात पराभूत करत मालिका खिशात घालण्यासाठी तयार असल्याचं दिसून येत आहे. (फोटो- बीसीसीआय)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
टीम इंडिया ब्रिस्बेनमध्ये अष्टपैलू रविंद्र जाडेजाशिवाय मैदानात उतरणार आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर रविंद्र जाडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली. त्यामुळे शेवटच्या सामन्यात खेळू शकणार नाही आहे. (फोटो- बीसीसीआय)

फोटोत जसप्रीत बुमराह गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्याशी चर्चा करताना दिसत आहे. दरम्यान जसप्रीत बुमराह अजूनही दुखापतीतून बाहेर आलेला नाही. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात तो खेळणार की नाही याबाबात अद्याप कळू शकलेलं नाही. जर बुमराह चौथ्या सामन्यात खेळू शकला नाही तर त्याच्या जागी टी नटराजन किंवा शार्दुल ठाकूरला संधी मिळू शकते. (फोटो- बीसीसीआय)
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गाबा मैदानावरील टीम इंडियाच्या सराव सत्राचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. हे या फोटो शेअर करत बीसीसीआयने लिहिले आहे की, ‘आम्ही गाबा येथे होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी तयारी सुरू केली आहे’. (फोटो- बीसीसीआय)
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट मैदानावर उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ड्रॉ केला. आता टीम इंडिया शुक्रवारपासून सुरू होणार्याा मालिकेतील चौथ्या आणि अंतिम कसोटी सामना जिंकण्यासाठी ब्रिस्बेनमधील मैदानावर सराव करण्यात गुंतली आहे. (फोटो- बीसीसीआय)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -