In Pics : भारत विरुद्ध बांगलादेश एकदिवसीय मालिकेची ट्रॉफी आहे फारच सुंदर, बीसीसीआयनं शेअर केले फोटो
न्यूझीलंडचा दौरा केल्यानंतर भारत आता बांगलादेश दौऱ्यावर पोहोचला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया दौऱ्यात तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत
यातील एकदिवसीय सामन्यांना रविवारपासून (4 डिसेंबर) सुरुवात होणार आहे.
यापूर्वी एकदिवसीय मालिकेतील विजेत्या संघाला मिळणारी ट्रॉफी कशी असेल हे समोर आले आहे.
बीसीसीआयनं या ट्रॉफीसोबत दोन्ही संघाच्या कर्णधारांचे फोटो शेअर केले आहेत.
सामन्यांना सुरुवात होण्याआधी एकदिवस दोन्ही कॅप्टन्सनी मिळून ट्रॉफी सर्वांसमोर सादर केली.
यावेळी 4, 7 आणि 10 डिसेंबर रोजी एकदिवसीय सामने होणार आहेत.
बांगलादेशच्या ढाका येथील शेर ए बांग्ला क्रिकेट स्टेडियमवर हे सर्व सामने खेळवले जाणार आहेत.
नुकतीच मोहम्मद शामीच्या जागी युवा गोलंदाज उमरान मलिकला संधी दिली गेली. शामी दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे.
या सामन्यात नेमकी कोणत्या खेळाडूंना संधी मिळेल हे पाहणं औत्सुक्याचं राहिलं