Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jennifer Winget : जेनिफर विंगेडचा फंकी अँड कूल अंदाज, हटके लूकनं वेधलं लक्ष
'बेहद' या छोट्या पडद्यावरील मालिकेतील मायाच्या भूमिकेमुळे तिला प्रेक्षकांची अधिक पसंती मिळाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेनिफर विंगेट सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देते.
नुकतेच जेनिफरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फंकी अँड कूल अंदाजातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जेनिफर शॉर्ट ड्रेसमध्ये कर्व्ही फिगर फ्लाँट करताना दिसत आहे.
जेनिफर विंगेटचा जन्म 30 मे 1985 रोजी मुंबईमध्ये झाला असून ती सध्या 37 वर्षांची आहे.
जेनिफरने अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात बाल कलाकार म्हणून 1995 साली 'अकेले हम अकेले तुम' या चित्रपटातून केली.
'शका लका बूम बूम' या मालिकेपासून जेनिफरने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.
2007 मध्ये जेनिफर दिल मिल गये मालिकेमध्ये झळकली होती. या मालिकेमध्ये तिची आणि करण सिंह ग्रोवरची मैत्री झाली.
जेनिफर आणि करण सिंह ग्रोवर यांच्या मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं आणि त्यानंतर त्यांनी 2012 मध्ये लग्न केलं.
मात्र त्यांचं हे नातं फार काळ टिकलं नाही आणि त्यांनी 2014 मध्ये घटस्फोट घेतला.
अलिकडेच जेनिफर विंगेट 'कोड एम' या वेब सीरिजमध्ये झळकली होती.