PHOTOS: Road Safety World Series: वेस्ट इंडिज लिजेंड्सला पराभूत करत इंडिया लिजेंड्स फायनलमध्ये
इंडिया लिजेंड्सने रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडिज लिजेंड्सला 12 धावांनी पराभूत करत लिजेंड्स इंडियाने फायनल गाठली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसचिन तेंडुलकरने पुन्हा एकदा धडाकेबाज अर्धशतक साजरं केलं आहे. सचिन तेंडुलकरने या सामन्यात 42 चेंडूंवर 65 धावांची दमदार खेळी केली. या खेळात सचिनने 6 चौके आणि तीन षटकार लगावले.
सचिनसोबत युवराज सिंगही सामन्यात चमकला. युवराजने 49 धावांची नाबाद खेळी केली. सामन्यात युवराजे सहा षटकार लगावले.
वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरने भारताला चांगली सुरुवात करुन दिली. सेहवागने पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 17 चेंडूत 35 धावांची खेळी केली. लिजेंड्स इंडियाची धावसंख्या 56 असताना पहिला धक्का बसला.
सेहवाग बाद झाल्यानंतर सचिन तेंडुलकरने मौहम्मद कैफच्या मदतीने लिंजेंड्स इंडियाची खेळी सुरु ठेवली. दोघांनी मिळून धावसंख्या 100 पार नेली. मोहम्मद कैफने 21 चेंडूत 27 धावांची खेळी केली.
सेहवाग बाद झाल्यानंतर सचिन तेंडुलकरने मौहम्मद कैफच्या मदतीने लिंजेंड्स इंडियाची खेळी सुरु ठेवली. दोघांनी मिळून धावसंख्या 100 पार नेली. मोहम्मद कैफने 21 चेंडूत 27 धावांची खेळी केली.