In Pics : शाहरुख खानची मुलगी सुहानाचा ग्लॅमरस अंदाज, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सर्वाधिक चर्चित स्टारकिड्सपैकी एक आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुहाना सोशल मीडियात खूप प्रसिद्ध आहे. तिनं टाकलेल्या प्रत्येक फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो.
सुहाना आपल्या पर्सनल लाईफशी संबंधित फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. ती सध्या अमेरिकेत आपलं शिक्षण पूर्ण करत आहे.
सुहानाचा जन्म 22 मे, 2000 रोजी मुंबईच्या ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये झाला. तिनं मुंबईतील धीरूभाई अंबानी स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतलं आहे.
सुहानाला स्पोर्ट्सचा चांगलाच छंद आहे. तिला फुटबॉल आणि क्रिकेट खूप आवडतं. सुहाना राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत देखील सहभागी झाली होती.
सुहानाला नृत्याची देखील आवड आहे. तिनं कोरियोग्राफर श्यामक दावर यांच्या डान्स स्कूलमधून डान्सचं प्रशिक्षण घेतलं आहे.
सुहाना आपल्या वडिलांसारखं बॉलिवूडमध्ये स्थान मिळवू इच्छिते. मात्र शाहरुखनं सांगितलं आहे की आधी तिनं आपलं शिक्षण पूर्ण करावं. सुहाना 21 वर्षांची आहे. ती आपल्या मित्रांबरोबर पार्ट्यांमध्ये देखील दिसून येते. याबाबतचे फोटो ती स्वत: शेअर करत असते.