In Pics | ऐश्वर्या, प्रियांका आणि बी टाऊनच्या अभिनेत्री अशी राखतात केसांची निगा
केस, ही सौंदर्याचीच परिभाषा सांगणाऱ्या घटकांपैकी एक. केसांची निगा राखण्याकडे अनेकांचाच कल असतो. सेलिब्रिटी मंडळीसुद्धा काही खास उपायांच्या सहय्यानं केसांची निगा राखतात. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही केसांसाठी अंड्याच्या मास्कचा वापर करते. अंड्याचा बलक आणि ऑलिव्ह ऑईल असा मास्क ती तयार करते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफळांचा वापरही ती केसांच्या आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी करते.
चण्याच्या डाळीची पेस्ट रेखा केसांची निगा राखण्यासाठी वापरतात असं म्हटलं जातं. केसांसाठी प्रोटीन तत्त्वंही तितकीच महत्त्वाची. जी सर्वच प्रकारच्या डाळींमध्ये असतात.
प्रियांका चोप्रा तिच्या केसांची निगा राखण्यासाठी नारळाच्या तेलाचा वापर करते. यापासूनच तयार करण्यात आलेल्या हेअर मास्कला ती प्राधान्य देते. मध, दही आणि अंड यांचा वापर करत ती हेअर मास्क तयार करते.
अभिनेत्री तमन्ना भाटीया केसांची निगा राखण्यासाठी कांद्याचा रस वापरते. ज्यामुळं केसगळती कमी होण्यास मदत होते आणि नवे केसही वेगानं उगवतात.