IND vs ZIM : शुभमन गिलकडे इतिहास रचण्याची संधी, झिम्बॉब्वेसमोर करो या मरो स्थिती, भारताचा पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय
शुभमन गिलच्या नेतृत्त्वात टीम इंडियानं चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या मॅचमध्ये सिकंदर रझाच्या टीमनं भारताचा पराभव केला होता. यानंतर पुढील दोन मॅचमध्ये भारतानं कमबॅक केलं होतं. सिकंदर रझा मालिकेतील आव्हान कायम ठेवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरु शकतो. शुभमन गिलनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटीम इंडियाचा युवा खेळाडू अभिषेक शर्मा त्याच्या आक्रमक खेळीमळं चर्चेत आहे. दुसऱ्या मॅचमध्ये त्यानं 100 धावा केल्या होत्या. तर, तिसऱ्या मॅचमध्ये त्यानं 10 धावा केल्या होत्या. चौथ्या मॅचमध्ये अभिषेक शर्मा पुन्हा सलामीला फलंदाजीला येऊ शकतो.
ऋतुराज गायकवाड देखील चांगल्या फॉर्ममध्ये असल्यानं त्याला संघात संंधी मिळेल.याशिवाय शिवम दुबे आणि संजू सॅमसन यांना देखील स्थान मिळेल. रवि बिश्नोईनं आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून आज देखील तो दमदार कामगिरी करु शकतो.
झिम्बॉब्वेवचा कॅप्टन बॅटिंग आणि बॉलिंग करतो. आजच्या मॅचमध्ये 17 धावा केल्यास तो झिम्बॉब्वेसाठी 2 हजार धावा करणारा पहिला खेळडू ठरणार आहे. भारताची संभाव्य टीम : अभिषेक शर्मा, शुभमन गिल (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड़, शिवम दुबे,संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, वाशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, तुषार देशपांडे , खलील अहमद
झिम्बॉब्वेचा संभाव्य संघ : वेस्ली मधेवरे, तदिवानाशे मारुमानी/इनोसेंट कैय्या, ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कॅप्टन), डायोन मायर्स, जॉनाथन कॅम्पबेल, क्लाइव मदांडे (विकेटकीपर), वेलिंगटन मसाकाद्जा, रिचर्ड नगारवा , ब्लेसिंग मुजरबानी, तेंदई चटारा