मुंबईत मुसळधार पाऊस, अंधेरी सबवेखाली 4 फूट पाणी
मुंबईत सकाळपाून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळं सखल भागात पाणी साचायला सुरुवात देखील झाली आहे.
मुसळधार पावसामुळं अंधेर सबवेखाली चार फुट पाणी साचलं आहे, त्यामुलं वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
आज मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईसह ठाणे पालघर परिसरात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
रसत्यावर पाणी साचल्यामुळं वाहतुकीवर देखील परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
पुढच्या 36 तासात मुंबईत 200 मिमी पावासाची नोंद होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
आज दिवसभर मुंबईत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
अंधेर सबवे खाली तीन चार फुट पाणी साचलं आहे. त्यामुळं तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यामुळं वाहतुकीवर परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे.