IND vs SL 1st T20: पहिल्या टी 20 मॅचमध्ये कुणाला संधी, सूर्याच्या ड्रीम टीममध्ये कोण असणार, संजू संघाबाहेर राहणार?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली टी 20 मॅच पल्लेकेले मध्ये खेळवली जाणार आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची पहिली मालिका असेल. सूर्यकुमार यादव देखील पूर्णवेळ कॅप्टन म्हणून संघाची सूत्रं हाती घेईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारत सलामीला यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलला संधी देईल. दोघांनी झिम्बॉब्वे दौऱ्यात चांगली कामगिरी केली आहे. शुभमन गिल या मालिकेत भारतीय संघाचा उपकॅप्टन आहे.
भारताकडून तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला रिषभ पंत मैदानात उतरेल. रिषभ पंत आणि संजू सॅमसन या दोघांमध्ये कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. रिषभ पंतचं पारडं सध्या तरी वरचढ असल्याचं दिसून येतं. यामुळं संजूला संघाबाहेर जावं लागू शकतं.
संजू सॅमसनला योग्य प्रमाणात संधी मिळालेली नाही मात्र गौतम गंभीरच्या कार्यकाळात त्याला संधी मिळू शकते. गोलंदाजीमध्ये भारताकडून अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज संघात असतील. याशिवाय रवि बिश्नोई आणि वॉशिंग्टन सुंदर देखील संघात असू शकतो. हार्दिक पांड्याचं स्थान तर संघात निश्चित आहे.गोलंदाजीमध्ये भारताकडून अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज संघात असतील. याशिवाय रवि बिश्नोई आणि वॉशिंग्टन सुंदर देखील संघात असू शकतो. हार्दिक पांड्याचं स्थान तर संघात निश्चित आहे.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रायन पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या , शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.