Suryakumar Yadav :टी 20 मालिका संपताच हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादवसह आणखी चार खेळाडू भारतात परतणार, कारण...
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतानं श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकली आहे. सूर्यकुमार यादवची केवळ टी 20 संघात निवड करण्यात आली होती. निवड समितीनं टी 20 संघाचा कॅप्टन म्हणून त्याच्यावर जबाबदारी सोपवली होती. पहिल्याच मालिकेत त्यानं भारताला विजेतेपद मिळवून दिलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहार्दिक पांड्यानं केवळ टी 20 मालिकेसाठी उपलब्ध असल्याचं सांगत टी 20 मालिकेतून माघार घेतली होती. हार्दिक पांड्याला पहिल्या दोन टी 20 मॅचमध्ये स्थान दिल्यानंतर तिसऱ्या मॅचमध्ये विश्रांती देण्यात आली होती.
संजू सॅमसनची देखील केवळी टी 20 संघात निवड करण्यात आली होती. त्याला दोन मॅचमध्ये संधी देण्यात आली होती. मात्र, तो अपयशी ठरला.
रवि बिश्नोईला केवळ टी 20 मालिकेत स्थान देण्यात आलं होतं. त्यामुळं टी 20 मालिका संपल्यानंतर तो भारतात परत येईल.
यशस्वी जयस्वालची देखील फक्त टी 20 संघात निवड करण्यात आली होती. यशस्वी जयस्वालनं पहिल्या मॅचमध्ये 40 धावांची खेळी केली होती. नंतरच्या दोन मॅचमध्ये आक्रमक फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला.
रिंकू सिंगला तिसऱ्या टी 20 मॅचमध्ये दमदार कामगिरी करता आलेली नाही. सूर्यकुमार यादवनं फलंदाजीसाठी वरच्या क्रमांकावर पाठवून देखील रिंकू सिंग अपयशी ठरला. त्याची देखील फक्त टी 20 संघात निवड झालेली असल्यानं मालिका संपल्यानंतर तो भारतात परतणार आहे.