Team India : भारताचे दिग्गज श्रीलंकेच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले, अभिषेक नायर यांनी पराभवानंतर कारण सांगितलं

IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. श्रीलंकेनं दुसरी मॅच जिंकत मालिकेत आघाडी घेतली आहे.

अभिषेक नायर

1/6
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या वनडे मॅचमध्ये भारतीय फलंदाजांनी हाराकिरी केली. रोहित शर्मा बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या 97 होती. 97 ते 208 धावा म्हणजे 101 धावांमध्ये भारतानं 10 विकेट गमावल्यानं संघावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.
2/6
भारताचे फलंदाजीचे प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी टीमच्या मधल्या फळीनं दोन सामन्यांमध्ये जी कामगिरी केलीय त्यानं धक्का बसल्याचं म्हटलं.
3/6
अभिषेक नायर यांनी खेळपट्टीसंदर्भात देखील भाष्य केलं. खेळपट्टीवर बॉल दोन्ही बाजूला फिरत होता,त्यामुळं मॅचचा निकाल कुणाच्याही बाजूनं लागला असता,असं त्यांनी म्हटलं.
4/6
रोहित शर्माला फलंदाजी करताना यश आलं आणि इतर फलंदाज अपयशी का ठरले असं विचारलं असता अभिषेक नायर यांनी नव्या बॉलला खेळताना फायदा होतो. मात्र, बॉल जुना झाल्यानंतर त्याचा सामना करणं अवघड होतं, असं त्यांनी म्हटलं.
5/6
भारतानं पहिल्या मॅचचा विचार केला असता दुसऱ्या मॅचमध्ये शिवम दुबेला चौथ्या स्थानावर, श्रेयस अय्यरला सहाव्या आणि केएल राहुलला सातव्या स्थानावर फलंदाजीला पाठवलं मात्र तिघेही अपयशी ठरले,असं नायर म्हणाले. अभिषेक नायर यांनी मधल्या फळीतील फलंदाजांच्या क्रमवारीत केलेल्या बदलाचं समर्थन देखील केलं.
6/6
दरम्यान, श्रीलंकेनं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
Sponsored Links by Taboola