Health : केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही, तर या 5 प्रकारेही फायदेशीर ऑलिव्ह ऑईल!
जेव्हा जेव्हा ऑलिव्ह ऑइलची चर्चा होते तेव्हा लोक ते वजन कमी करण्यासाठी खूप चांगले मानतात. सामान्यतः लोक त्यांच्या वजन कमी करण्याच्या आहारामध्ये स्वयंपाक करण्यासाठी किंवा सॅलड ड्रेसिंगसाठी ऑलिव्ह ऑइल वापरतात. हे खरे आहे की ऑलिव्ह ऑइल तुमचे वजन संतुलित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयुक्त आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऑलिव्ह ऑईलचे फायदे फक्त एवढ्यापुरतेच मर्यादित नाहीत. त्यात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के आणि इतर अनेक पोषक तत्वांसह अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे तुमच्या संपूर्ण आरोग्याची काळजी घेतात.
यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस् असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. जेव्हा तुम्ही ऑलिव्ह ऑइलला तुमच्या आहाराचा एक भाग बनवता, तेव्हा ते तुमच्या हृदयाच्या आरोग्यास मदत करते आणि शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ होण्यापासून वाचवते.
हृदय व रक्तवाहिन्यासाठी फायदेशीर - ऑलिव्ह ऑइलच्या सेवनाने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीवर चांगला परिणाम होतो. कारण ते LDL कोलेस्टेरॉल म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते. एवढेच नाही तर ऑलिव्ह ऑइलमध्ये पॉलिफेनॉल भरपूर प्रमाणात असते. हे पॉलिफेनॉल रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी ऑलिव्ह ऑईल उपयुक्त आहे. त्यामुळे ते तुमच्या हृदयासाठी खूप चांगले मानले जाते.
कर्करोगाचा धोका कमी करते - ऑलिव्ह ऑइलचे सेवन करण्याचा एक फायदा म्हणजे कर्करोगाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. ऑलिव्ह ऑइलमध्ये असलेले पॉलीफेनॉल चांगले अँटी-ऑक्सिडंट असतात. ऑलिव्ह ऑइलचे सेवन केल्याने आतडे, स्तन, कोलन, एंडोमेट्रियम, प्रोस्टेट इत्यादींच्या कर्करोगाचा धोका प्रभावीपणे कमी होतो. हायड्रॉक्सीटायरोसोल आणि टोकोफेरॉलमध्ये शक्तिशाली कर्करोगविरोधी गुणधर्म आहेत.
पचनसंस्थेसाठी फायदेशीर - ऑलिव्ह ऑइल हे पचनसंस्थेसाठी खूप चांगले मानले जाते. जेव्हा तुम्ही ते तुमच्या आहाराचा एक भाग बनवता तेव्हा ते पोषक तत्वांचे अधिक चांगले शोषण करते. ऑलिव्ह ऑइलमध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आढळतात. त्यामुळे याच्या सेवनाने तुमची पचनक्रिया सुधारते.
हाडे मजबूत करते - ऑलिव्ह ऑइलमुळे तुमची हाडेही मजबूत होतात हे फार कमी लोकांना माहिती असेल. कारण ऑलिव्ह ऑइल कॅल्शियम शोषण्यास मदत करू शकते. त्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते आणि त्यामुळे तुमची हाडे मजबूत होतात.
मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर- ऑलिव्ह ऑइल हे मेंदूच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते. याचे कारण असे की ऑलिव्ह ऑइलमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते, जे निरोगी मेंदूचे कार्य राखण्यासाठी आवश्यक असते. हे अल्झायमर रोगापासून तुमचे संरक्षण करू शकते. काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की ऑलिव्ह ऑइल मेंदूच्या पेशींमधून बीटा-अमायलोइड प्लेक्स काढून टाकण्यास मदत करू शकते, जे अल्झायमर रोगाचे चिन्हक आहेत.