IND vs SA : पहिल्याच सामन्यात भारताचा धुव्वा, भारताचा सात गड्यांनी पराभव, द. आफ्रिकेची मालिकेत आघाडी
IND vs SA, Match Highlights: डेविड मिलर आणि रॅसी वॅन डर डुसेन यांच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं भारताचा सात गड्यांनी पराभव केला. भारताने दिलेले 212 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकाने सात गडी आणि पाच चेंडू राखून पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेकडून डेविड मिलर आणि डुसेन यांनी मॅच विनिंग खेळी केली. ईशान किशनची 76 धावांची खेळी व्यर्थ केली. या विजयासह दक्षिण आफ्रिकेनं पाच सामन्याच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदक्षिण आफ्रिेकाचा कर्णधार टेम्बा बावुमा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एडन मार्करमला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे पहिल्या टी 20 सामन्यातून वगळण्यात आले.
ईशान किशन (76) याची वादळी खेळी, त्यानंतर हार्दिक-पंतचा फिनिशिंग टचच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात 211 धावा केल्या. ईशान किशन 76 तर श्रेयस अय्यर 36 धावांवर बाद झाले.
ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी 40 चेंडूत 80 धावांची भागिदारी केली. यामध्ये अय्यरने 15 चेंडूत 28 तर ईशान किशनने 25 चेंडूत 50 धावा चोपल्या.
डेविड मिलरने नाबाद 64 तर डुसेन याने नाबाद 75 धावांची खेळी केली. दोघांनी तब्बल 10 षटकार लगावले. मिलर आणि डुसेनच्या फलंदाजीसमोर भारतीय गोलंदाजी कमकुवत जाणवत होती.
भारताने दिलेले 212 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकाने सात गडी आणि पाच चेंडू राखून पूर्ण केले.
भारताने दिलेल्या 212 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. कर्णधार टेम्बा बावुमा अवघ्या 10 धावा काढून माघारी परतला. त्यानंतर डिकॉक आणि प्रिटोरिअस यांनी डाव सावऱण्याचा प्रयत्न केला. पण प्रिटोरिअस 29 आणि डिकॉक 22 धावांवर बाद झाला.
दक्षिण आफ्रिकेचा डाव कोसळला असे वाटत असतानाच डुसेन आणि डेविड मिलर यांनी दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला. दोघांनी 64 चेंडूत नाबाद 131 धावांची भागिदारी केली.
भारताकडून एकाही गोलंदाजाने अचूक टप्प्यावर मारा केला नाही. प्रत्येक गोलंदाजाला 9 पेक्षा जास्त सरासरीने चोप बसला. भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.