Health Tips : गुळाच्या चहाचे नेमके फायदे की तोटे?
गूळ हा पदार्थ गरम असल्यामुळे गुळाचं सेवन करण्याला अनेकांची पसंती असते. काहीजण नुसताच गूळ खाण्याऐवजी गुळाचा चहा पिण्याला पसंती देतात. आरोग्यासाठी हा चहा अतिशय लाभदायी असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळे गुळाचा वापर करुन तयार करण्यात आलेल्या चहाचे कैक फायदे शरीराला होतात. यामुळे पाचनशक्तीही सुरळीत राहते.
मायग्रेनचा त्रास असणाऱ्यांसाठीही गुळाचा चहा फायदेशीर ठरतो.
गुळामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरात रक्त कमी असल्यासही हा चहा प्यायल्यास हे प्रमाण नियंत्रणात येतं.
मधुमेह - गुळाच्या अती सेवनानं रक्तातील साखरेचं प्रमाणही वाढतं. 10 ग्रॅम गुळामध्ये जवळपास 9.7 ग्रॅम इतकी साखर असते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी गुळाचे सेवन शक्यतो टाळलेलं बरं.
नाकातून रक्तस्त्राव - गूळ मुळातच एक गरम पदार्थ आहे. त्यामुळं गरम वातावरणात याचं सेवन केल्यास अनेकदा नाकातून रक्त वाहण्यासही सुरुवात होते. पोटातील गरमी वाढल्यामुळे याचे परिणाम त्वचेवरही दिसून येतात.
पॅरासिटीक इन्फेक्शन - अती गुळ खाणं ज्याप्रमाणे घातक ठरु शकतं त्याचप्रमाणे खराब दर्जाचा आणि योग्य पद्धतीने तयार न केला गेलेला गुळ खाणंही धोक्याचं ठरतं. त्यामुळं ही काळजी घेतली जाणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.