In Pics : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत 7 विकेट्सनी विजय, असा पार पडला सामना, पाहा फोटो
भारतीय संघान दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 7 विकेट्सने दमदार मात देत मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतासाठी मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी हा करो या मरोचा सामना होता. त्यात या सामन्यात भेदक गोलंदाजी आणि तुफान फलंदाजी करत भारताने विजय अखेर मिळवलाचं
भारताने श्रेयस अय्यरचं शतक आणि ईशानच्या नाबाद 93 धावांच्या जोरावर सामना 7 विकेट्सने जिंकला.
सामन्यात सर्वात आधी दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
ज्यानंतर त्यांची सुरुवात खास झाली नाही.
पण दक्षिण आफ्रिकेकडून एडन मार्करमने रीझा हेंड्रीक्ससोबत मिळून दमदार अशी शतकी भागिदारी केली. रीझाने 74 तर मार्करमने 79 धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला. भारताकडून सिराजने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
ज्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं फलंदाजी येत 279 धावाचं लक्ष्य भारतासमोर ठेवलं.
मग 279 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या भारताची सुरुवात खास झाली नाही. कर्णधार शिखर धवन 13 धावा करुन पारनेच्या चेंडूवर बाद झाला.
सलामीवीर शुभमनही 28 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर मात्र ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या युवा खेळाडूंनी तुफान फटकेबाजी करत भारताचा डाव सावरला. ईशान किशन 93 धावा करुन बाद झाला.
मग श्रेयसने आपला स्पीड वाढवला, त्याच्यासोबतीला संजूही आला. ज्यानंतर श्रेयसच्या नाबाद 113 आणि संजूच्या नाबाद 30 धावांच्या जोरावर भारताने सामना 7 विकेट्सने जिंकला.