ओला दिवाळीत लॉन्च करणार नवीन इलेक्ट्रिक वाहन, कार असेल की स्कूटर?
ओला इलेक्ट्रिक या दिवाळीत नवीन उत्पादन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विटरवर सांगितले आहे की, कंपनी 22 ऑक्टोबर रोजी नवीन इलेक्ट्रिक उत्पादन लॉन्च करणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयासोबतच काही नवीन उत्पादने आणि योजनाही समोर येतील. नवरात्रीच्या दरम्यान भाविश यांनी ट्वीट केले होते की, या महिन्यात काहीतरी मोठे करण्याची तयारी करत आहे. ते म्हणाले होते की, या उत्पादनामुळे इलेक्ट्रिक वाहन क्रांतीला किमान 2 वर्षांनी गती मिळू शकते.
भाविश अग्रवाल यांनी नवीन वाहन लॉन्च करणार असल्याची घोषणा केली असली, तरी हे वाहन कार असले की, स्कूटर याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.
मात्र वाहन बाजारात अशी चर्चा आहे की, ओला नवीन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करू शकते. जी S1 इलेक्ट्रिक स्कूटरच्या विद्यमान रेंजपेक्षा किफायतशीर असेल. या व्यतिरिक्त, कंपनी आपल्या विस्ताराच्या काही नवीन योजना देखील उघड करू शकते.
अलीकडेच कंपनीने चेन्नईमध्ये आपले पहिले अनुभव केंद्र सुरू केल्याची घोषणा केली होती. या योजनेनुसार कंपनी मार्च 2023 पर्यंत देशभरात अशा 200 सुविधा उभारणार आहे.
. याव्यतिरिक्त, ओलाने अलीकडेच तामिळनाडूमध्ये संपूर्ण महिला कामगार वर्ग असलेला कारखाना सुरू केला आहे. ओला फ्युचर फॅक्टरीची स्थापना आठ महिन्यांच्या कालावधीत झाली. यामध्ये सध्या 2,000 महिलांना रोजगार मिळाला आहे.
ओला टीम नजीकच्या भविष्यात ही संख्या 10,000 पर्यंत नेण्याचा आणि जगातील सर्वात मोठा दुचाकी ईव्ही कारखाना बनवण्याचा विचार करत आहे.
दरम्यान, ओला इलेक्ट्रिक कारवरही काम करत आहे. भाविश यांनी या कारचा खुलासा ओला फ्युचर फॅक्टरी येथे एका कार्यक्रमादरम्यान केला आहे. ओलाची पहिली इलेक्ट्रिक कार 2023 मध्ये लॉन्च होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
देशात परवडणारी इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यासोबतच ओला इलेक्ट्रिक लिथियम-आयन बॅटरीचे उत्पादनही सुरू करणार आहे.
आगामी काळात कंपनी भारतात एक EV सेल उत्पादन कारखाना स्थापन करू शकते. जिथे बॅटरी 100% अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार केली जाईल. सध्या भारतात विकल्या जाणाऱ्या बहुतांश इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी बाहेरून आयात केल्या जातात.