Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO : 'या' 5 चुका स्मार्टफोनच्या स्फोटाचं ठरतात कारण; वेळीच सावध व्हा!
Smartphone Care : तुम्हालाही तुमच्या स्मार्टफोनचा स्फोट होण्याची भीती वाटते का? पण घाबरू नका, कारण आम्ही तुम्हाला अशा चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्या टाळून तुम्ही तुमचा स्मार्टफोन स्फोट होण्यापासून वाचवू शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्ही लोकल चार्जर वापरून स्मार्टफोन चार्ज करत असाल, तर असे अजिबात करू नका. कारण तुम्ही वापरत असलेला लोकल चार्जर तुमच्या स्मार्टफोनमधील बॅटरी ब्लास्ट होण्याचं कारण ठरु शकतं. स्थानिक चार्जर तुमच्या स्मार्टफोनच्या बॅटरीवर दबाव टाकतो, ज्यामुळे बॅटरीचा स्फोट होऊ शकतो. अशा परिस्थितीत लोकल चार्जर वापरणं टाळलं पाहिजे.
जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये सतत हेवी गेम्स खेळत असाल, तर यामुळे स्मार्टफोनचा स्फोट देखील होऊ शकतो. कारण गेम खेळताना अनेक वेळा प्रोसेसर वेगानं काम करतो, ज्यामुळे स्मार्टफोन गरम होऊन स्फोट होऊ शकतो.
जर तुम्ही तुमचा मोबाईल तुमच्या लेदर बॅगेत ठेवून उन्हाळ्यात तासन्तास मोबाईल वापरत असाल, तर स्मार्टफोनचा स्फोट होण्याची दाट शक्यता असते. त्यामागचं कारण म्हणजे, फोन बराच वेळ बॅगेत ठेवल्यानं तो गरम होतो.
काही युजर्स त्यांचे स्मार्टफोन अनेक महिने अपडेट करत नाहीत. ज्यामुळे प्रोसेसर योग्य प्रकारे काम करू शकत नाही आणि जेव्हा प्रोसेसर योग्यरित्या काम करत नाही, तेव्हा फोन जास्त गरम होऊ लागतो. गरम झाल्यावर स्मार्टफोनचा स्फोट होण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी फोन वेळोवेळी अपडेट केला पाहिजे.
जर तुम्ही स्मार्टफोन चार्ज होत असताना वापरत असाल, तर असं करणं लगेच थांबवा, कारण काहीवेळा स्मार्टफोनवर अचानक प्रेशर वाढतं. त्यामुळे स्मार्टफोन फुटण्याची परिस्थिती निर्माण होते.